स्ट्रोकनंतर सहा दिवसांनीही उपचाराची संधी
★ वोक्हार्ट हॉस्पिटलमधील आव्हानात्मक प्रकरणावर यशस्वी उपचार
नागपूर: ( दि. २७ ऑक्टों २०२६ ) स्ट्रोक (पक्षघात) आल्यानंतर ठरावीक वेळ उलटून गेल्यानंतरही प्रगत तपासण्यांच्या आधारे रुग्णाचे प्राण आणि मेंदू वाचवणे शक्य होऊ शकते, हे वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर येथील एका गुंतागुंतीच्या प्रकरणात सिद्ध झाले आहे. कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. अमित भट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा आव्हानात्मक उपचार यशस्वी करण्यात आला.
एका वृद्ध रुग्णाला उजव्या बाजूला अशक्तपणा आणि बोलण्यात अडचण जाणवू लागल्याने वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, ही लक्षणे सुरू होऊन तब्बल सहा दिवस झाले होते. यापूर्वी तिसऱ्या दिवशी घेतलेल्या तपासणीत मेंदूच्या डाव्या बाजूला रक्तपुरवठा कमी झाल्याचे व मुख्य रक्तवाहिन्या (ICA व MCA) बंद असल्याचे समोर आले होते. हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा रुग्णाला उजव्या बाजूचा लकवा जाणवत होता आणि ते गंभीर गुंगीत होते.
जरी उपचाराची ठरावीक वेळ निघून गेली होती, तरी एमआरआय आणि डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी (DSA) या प्रगत तपासण्यांमधून डॉक्टरांना असे आढळले की, रक्तवाहिन्यांच्या पर्यायी मार्गांमुळे मेंदूचा काही भाग अजूनही जिवंत होता आणि त्याला वाचवता येणे शक्य होते.