अलाईड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्सतर्फे द इंडियन एडिट प्रीमियम व्हिस्की लाँच
मुंबई (११ सप्टेंबर २०२६)
भारतातील अग्रगण्य स्पिरिट्स कंपनी अलाईड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लिमिटेड (एबीडी) ने आज आपल्या नवीन प्रीमियम व्हिस्की द इंडियन एडिट (The Indian Edit) च्या लाँचची घोषणा केली. ही व्हिस्की आधुनिक भारतीय ओळखीचा गौरव करणारी असून, यामुळे प्रीमियम स्पिरिट्सच्या क्षेत्रात एक स्वतंत्र मानदंड प्रस्थापित झाला आहे.
★ भारतीय माल्ट आणि अनोखे पॅकेजिंग
द इंडियन एडिट हे भारतीय माल्ट आणि ग्रेन स्पिरिट्ससह उत्कृष्ट स्कॉच माल्ट्सचे विशेष मिश्रण आहे. यामध्ये व्हॅनिला, कॅरॅमल आणि सौम्य ओकचा स्वाद असून ते ग्राहकांना समृद्ध आणि प्रदीर्घ फिनिशचा अनुभव देतात.
या बाटलीचे डिझाइन भारतीय संस्कृती आणि चलनी नोटांवर आधारित असून, त्यावर अनेक प्रादेशिक भाषा कोरल्या गेल्या आहेत. लेबलबद्दल सांगायचे तर, त्यावर क्लासिक भारतीय फिरत्या सर्कसची आठवण करून देणारे व्हिंटेज मोटिफ आहे, तर बाटलीचे झाकण (कॅप) महाराजांच्या मुकुटाच्या डिझाइनमध्ये बनवण्यात आले आहे.
या लाँचबाबत बोलताना एबीडीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) अमर सिन्हा म्हणाले, भारतातील स्पिरिट्स उद्योग एका महत्त्वाच्या वळणावर आहे आणि प्रीमियम व्हिस्की या बदलाच्या केंद्रस्थानी आहे. ग्राहक आज गुणवत्ता, वेगळेपण आणि अधिक विकसित ड्रिंकिंग अनुभवाचा शोध घेत आहेत. या क्षेत्रात केवळ सहभागी होण्याऐवजी नेतृत्व करण्याची आमची महत्त्वाकांक्षा आहे.
तसेच एबीडीचे ग्रुप चीफ मार्केटिंग अँड इनोव्हेशन ऑफिसर बिक्रम बसू म्हणाले, ही व्हिस्की आधुनिक, जागतिक पातळीवर स्पर्धात्मक आणि आपल्या प्राचीन संस्कृतीशी जोडलेल्या व्यक्तींचा गौरव करते. या स्पिरिट्स व्यवसायात उल्लेखनीय यश मिळवून देण्याच्या आमच्या क्षमतेबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
द इंडियन एडिट व्हिस्की ७५० मिली, ५०० मिली आणि १८० मिली अशा तीन पॅकमध्ये उपलब्ध असणार आहे. ही व्हिस्की महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब, चंदीगड, राजस्थान, गोवा, दमणा, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या प्रमुख बाजारपेठांमध्ये उपलब्ध करून दिली जात आहे.
महाराष्ट्रामध्ये ७५० मिली पॅकची किंमत १,५५० रुपये निश्चित करण्यात आली आहे. विविध राज्यांच्या उत्पादन शुल्क नियम आणि कररचनेनुसार किंमती बदलू शकतात



































































































































































































































































































































































































































































































