चंन्द्रमणी नगरातील उद्यानाची दुरवस्था
★ मनपा प्रशासनासह स्थानिक आमदाराचे दुर्लक्ष
नागपूर: ( दि. २८ मे २०२४ ) उद्यानात प्रवेश करताच स्वच्छता आणि हिरवळ पाहून मन प्रसन्न होते, मात्र शहरभरात असे अनेक भाग आहेत जिथे महापालिका आणि महापालिकेची शेकडो उद्याने आहेत, त्यांची देखभालीअभावी दयनीय अवस्था झाली आहे. चंद्रमणी नगर परिसरात अनेक उद्याने आहेत, मात्र त्यातील काही महापालिकेची तर काही एनआयटीची आहेत. उल्लेखनीय म्हणजे एनआयटी अंतर्गत असलेली उद्याने महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली असून, त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. या उद्यानांमधील मोठ्या उद्यानांची संबंधित विभागाकडून काळजी घेतली जाते, मात्र लहान उद्यानांकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते नरेन्द्र सरोदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली
चंद्रमणी नगरात उद्यान आहे. परंतु या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. गार्डनमध्ये मोठ मोठे गवत वाढले आहे. येथे साप बाहेर येत आहेत. गार्डनमधील झुले तुटले आहेत, वॉकिंग ट्रॅकवर ग्रीन जीम बसविल्याने नागरिकांना वॉकिंग ट्रॅकचा वापर करता येत नाही. गार्डनमधील खेळणी तुटलेली आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून उद्यानामधील स्ट्रीट लाईट रात्र दिवस सुरु आहेत त्याची देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. असे असतानाही महापालिका त्याच्या देखभालीकडे लक्ष देत नाही. उद्यानात मोकाट कुत्र्यांची दहशत आहे. उद्यानात गाई-म्हशींचा डेरा आहे. यामुळे येथे अस्वच्छता भरलेली आहे. गेट समोर लोक आपली वाहने पार्क करीत असल्यामुळे. नागरिकांनी येथे येणे बंद केले आहे. येथे गार्ड राहत नसल्यामुळे गार्डनमध्ये असामाजिक तत्त्वांचा वावर राहतो. असामाजिक तत्त्व शिवीगाळ करणे, जुगार खेळणे, मद्य प्राशन करणे असे प्रकार गार्डनमध्ये करीत असल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना मनस्ताप होत आहे. या संदर्भात आमदार मोहन मते यांना अनेकदा तक्रारी करूनही कारवाई करण्यात येत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.




























































































































































































































































































































































































































