केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेडकडे रवाना
नागपूर, (दि. २६ मे २०२५ ) नागपुर येथे आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज दुपारी नागपूर येथून विशेष विमानाने नांदेडकडे प्रयाण झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी, आमदार संदीप जोशी यावेळी केंद्रीय गृहमंत्री शहा यांना निरोप देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे उपस्थित होते.
नागपूरमध्ये श्री. शाह यांनी आज नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल येथील 'स्वस्ति निवास' या निवासी इमारतीचे भूमिपूजन केले. तसेच, चिचोली येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते संपन्न झाले.
०००




























































































































































































































































































































































































































