स्व. देवकीबाई बंग इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक निकाल व दीक्षांत समारंभ उत्साहात
★ के जी -2 च्या चिमुकल्यांचा रंगला ग्रॅज्युएशन डे मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गौरव
हिंगणा : (दि. २९ एप्रिल २०२६ ) कान्होलीबारा स्थानिक स्व. देवकीबाई बंग इंग्लिश मीडियम स्कूल येथे वार्षिक निकाल वितरण समारंभ आणि इयत्ता के जी -2 च्या विध्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे (दीक्षांत समारंभ) अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्था, हिंगणाचे कोषाध्यक्ष महेश बंग होते. प्रमुख पाहुणे म्हणून नेहरू विद्यालय, हिंगणाचे माजी मुख्याध्यापक शशिकांत मोहिते यांची उपस्थिती लाभली. मंचावर स्व. देवकीबाई बंग इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य नितीन तुपेकर, शाळेचे मुख्याध्यापक संदीप कैलुके आणि ईशानी मित्रा प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या इयत्ता के जी -2 च्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ मोठ्या दिमाखात साजरा झाला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, मेडल आणि पदवी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सोबतच वार्षिक निकालही जाहीर करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना महेश बंग यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले आणि त्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी मौल्यवान मार्गदर्शन करत प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली लाड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार आश्लेषा मानकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते, ज्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झाली.


























































































































































































































































































































































































































































