शिवम असोशिएट ने अनाथलयात साजरा केला बालक दिवस
★ मुलांना केले शालेय साहित्याचे वितरण
नागपूर- (14 नोव्हेंबर 2025) पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस सम्पूर्ण भारतात बालदिवस म्हणून साजरा केला जातो. पंडित नेहरू म्हणतात की मुले ही देशाचे भविष्य आहे त्यामुळे त्यांचे संगोपन प्रेमाने व्हायला पाहिजे. अश्याच प्रेमाची आस अनाथ बालकाना सुद्धा असते आणि याच प्रेमाची पूर्तता करण्याच छोटासा प्रयत्न शिवम अशोसिएट संस्था नेहमी करत असते. शिवम असोशिएटचे डॉक्टर सि एम डी शिवानंद निल्लावर,यांच्या आदेशान्वये व धर्मविर एम डी सुभाष नंन्दरगीर, डायरेक्टर रावसाहेब शितोळे यांच्या मार्गदर्शनात बालदिनाचे औचित्य साधून शिवम ने उत्तर नागपूरातील प्रवेश नगर येथील समता अनाथ सेवा अनाथलयातील मुलांसोबत “बाल दिवस” साजरा केला.
उज्वल भारताचे उद्या चे भविष्य असलेल्या बालाकानवर चांगले संस्कार व्हावे या उद्देशाने सर्वप्रथम आश्रमातील मुला समवेत सर्वानी “राष्ट्र गित सादर करून प्रार्थना घेतली सोबतच राष्ट्रीय प्रतिज्ञा घेऊन त्याचा अर्थ मुलाना सांगण्यात आला. त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास व्हावा या दृष्टी ने जेष्ठ पी पी लिडर संजय सोनवने यांच्या हस्ते शालेय सामुग्री भेटस्वरूपात देण्यात आली. त्यांच्या सोबत स्नेह भोजन करुन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यात आला. यावेळी संतोष शिरसाट, विष्णु फुले, रविंद्र काकडे, परमानंद जनबंधू, सि एम वासनिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीते साठी समता अनाथ सेवा अनाथलयाचे अध्यक्ष अशोक बहादूरे, आकाश बहादूरे, भारत चवरे, शारदा कुबळे, एकता बहादूरे, ज्योति विनवाने यांनी मेहनत घेतली.




























































































































































































































































































































































































































