नागपुरात सेक्स रॅकेट आणि एमडी पावडर रॅकेटचा पर्दाफाश
★ गुन्हे शाखेची कारवाई, एकाला अटक
नागपूर:( दि. १७ सप्टेंबर २०२६ ) उपराजधानीत देहव्यापार चालवणाऱ्या आणि एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (१७ सप्टेंबर) रात्री मोठी धडक कारवाई केली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान नगर परिसरात पोलिसांनी सापळा रचून एका आरोपीला रंगेहाथ अटक केली. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून १ लाख १८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सार्वजनिक ग्रंथालयासमोर रेड कारवाई
सामाजिक सुरक्षा विभाग व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे अधिकारी गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे हनुमान नगर येथील सार्वजनिक ग्रंथालयासमोरील रस्त्यावर पंचांसमक्ष धाड टाकण्यात आली.
आरोपी मंथन गोपाल थोटे (वय २३, रा. चंद्रमणी नगर, गल्ली क्र. ०७, नागपूर)..पाहिजे असलेला आरोपी कुणाल यशवंत येडेकर (रा. दुर्गा नगर, नागपूर) याने हे ड्रग्ज आणण्यास मदत केल्याचे उघड झाले आहे.
आरोपी मंथन थोटे याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलेला कमी वेळात जास्त पैसे कमवण्याचे आमिष दाखवून देहव्यावसायात ढकलले होते.
आरोपीच्या अंगझडतीतून देहव्यवसायातील १,५०० रुपये रोख, २ मोबाईल फोन, ॲक्टिव्हा गाडी आणि एका झिपलॉक पन्नीमध्ये ३.६१० मिलीग्राम एमडी पावडर जप्त करण्यात आली. आरोपींविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३(२), अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायदा कलम ३, ४, ५, ७ सह एनडीपीएस ॲक्ट च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला अजनी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उप आयुक्त दीपक अग्रवाल, सह. पोलीस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. दर्शन पाटील, सपोनि. शिवाजी ननवरे, पोहवा. किशोर ठाकरे, प्रकाश माथनकर, सुनिल वाकडे, लक्ष्मण चौरे, मपोहवा लता गवई, पोअं. कुणाल बोडखे, नितीन वासने व मपोअं. पुनम शेंडे यांनी केली.



























































































































































































































































































































































































































































































































































