गॅस धोरणाविरोधात वंचितचे चुल पेटवा आंदोलन
★ वंचित बहुजन आघाडीचे केंद्र व राज्य सरकार विरोधात जन आक्रोश आंदोलन
नागपूर ( दि. ८ एप्रिल २०२६ ) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या गॅस सिलेंडर संदर्भातील धोरणा विरोधात नुकतेच संविधान चौक येथे शहराध्यक्ष मंगेश वानखेडे व् जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी चूल पेटवा आंदोलन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणा विरोधात जोरदार नारे निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला. जर निवडणुकी मध्ये गॅस सिलेंडर निवडला असता तर आज किचन मध्ये गॅस सिलेंडर मिळाला असता. नरेंदर कब मिलेंगा सिलेंडर? या प्रकारे घोषणा देत शासनाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी एक शिष्ठमंडळ नवनियुक्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून गॅस सिलेंडर साठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी. गॅस सिलिंडरच्या काळा बाजार रोखावा. 25 दिवसांनंतर गॅस मिळेल, ही अट शिथिल करण्यात यावी. काळाबाजार करणाऱ्या लोकांवर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात यावी. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सरकार कडून कम्युनिटी किचन सुरु करावेत. सरकारकडून प्रत्येक 2 किलोमीटर जेवणाची व्यवस्था करून गरजू लोकांना अन्न देण्यात यावे. सरकारने सांगावे की, परिस्थिती कधी सामान्य होईल? जेणेकरून सामान्य लोकांना ह्या परिस्थितीसाठी तयार राहता येईल. राज्यात अनेक ठिकाणी kyc नाही म्हणून नागरिकांना गॅस सिलेंडर दिला जात नाही. नागरिकांना तातडीने गॅस दिला जावा. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये उज्वला गॅस योजने अंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले आहे? याचे ऑडिट करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.
याआंदोलन करताना वंचित बहुजन आघाडी नागपूर जिल्हा शहर व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्व विदर्भ संयोजक राहुल वानखेडे, जिल्हाध्यक्ष महानंदा राऊत, अनिरुद्ध मडके, महासचिव राहुल दहिकर, मनोज सुटे, सी. सी. वासे, राजेश ढोके, वैभव येवले, शुभम वाहने, पवन तागडे, विजय गोंडुळे, आनंद चौरे, विनोद मोहोड, सिद्धार्थ भांगे, किशोर धोटे, शशांक ओगला, किरण देवरे, साधना नितनवरे, शितल नंदगवळी, रंजना पाटील, नलिनी खांडेकर, वंदना पेटकर, कमलेश शंभरकर, विनोद गजभिये, किशोर बांबोडे, रोशनी लोणारे, सुनीता बोरकर, सरला मेश्राम, प्रतिमा शेंडे, राजेंद्र फुलझले, अरुण गजभिये, धनेश्वर ढोके, शांताराम ढोके, जगदीश रंगारी, नागेश बोरकर, बंटी पानतावणे, सतीश पाटील, वसंता मडके व इतरही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे स्वयंपाक घरातील गॅस शेगड्या थंड पडल्या आहेत, चहाची टपरी, रस्त्यावरील नाश्ता स्टॉल बंद झाले आहेत. घरातील स्वयंपाक कोळसा व लाकडाचा वापर करून चुल पेटवून करावे लागत आहे. अशा अनेक समस्या गॅस सिलेंडर टंचाई मुळे निर्माण झाली असल्याचे शहराध्यक्ष मंगेश वानखेडे यांनी सांगितले.



































































































































































































































































































































































































































