मारुती सुझुकी कारची पल्सर दुचाकीला जोरदार धडक, कारचालक पसार
दामिनी पथकाची उत्कृष्ट कामगिरी बाबत
मुंबई: ( दि. 4 मार्च 2026 ) कल्याण पश्चिम मुरबाड रोड, येथे मंगळवारी एका मारुती सुझुकी कारनी एका पल्सर दुचाकीला मागून जोरदार धडक देवून कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला. गस्तीवर असलेल्या दामिनी पथकानी कारचा पाठलाग करीत त्याच्या मुसक्या आवळल्या.
धुळवळीच्या दिवशी काल मंगळवार 3 मार्च रोजी सायंकाळी 18 : 45 वाजता चे सुमारास महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीत मुरबाड रोड स्टेट बँक समोरून काळया रंगाच्या पल्सर क्रमांक MH-14 LF-6945 हिचे वरून एक इसम सुभाष चौक कडून स्टेट बँक ऑफ इंडिया कडे जात असताना स्टेट बँकेचे समोर मुरबाड रोड कल्याण पश्चिम येथे मागून येणाऱ्या मारुती सुझुकी एक्सएल सिक्स कार क्रमांक MH-05 EV-4766 पांढऱ्या रंगाची हिचे वरील कार चालकाने वरील क्रमांकाच्या पल्सर वरील चालकास मागून ठोकर मारून अपघात करून अपघात झालेल्या इसमास मदत न करता पळून जात असताना दरम्यानचे काळात दामिनी पथकाच्या पेट्रोलिंग गस्त वरील महिला पोलीस हवालदार 4906 संजना पावसकर तसेच महिला पोलीस शिपाई 7438 कोमल धनगर यांनी समक्ष घटना बघितल्याने लागलीच क्षणाचा ही विलंब न करता महिला पोलीस शिपाई 7438 कोमल धनगर यांनी जखमी इसमास तात्काळ रुक्मिणीबाई हॉस्पिटल येथे दवा उपचार कामी नेण्यात आले तसेच महिला पोलीस हवालदार संजना पावसकर यांनी पळून जात असलेल्या वरील चार चाकी वाहनाचा शिताफिने पाठलाग करून त्यास तात्काळ ताब्यात घेतले .
तदनंतर लागलीच घटनास्थळावर पोलीस ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक श्री जाधव यांना बोलावून त्यांचे मदत घेऊन सदर वाहन ताब्यात घेण्यात आले. सदर कार मधील कारचालक व त्यांचे सोबत असलेला एक इसम यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे.




























































































































































































































































































































































































































