मारवाडी संमेलन नागपूर शाखा व मारवाडी युवा मंच नागपूर शाखा पदाधिकाऱ्यांचा शपथ ग्रहण समारंभ
अखिल भारतवर्षीय मारवाडी संमेलनाची नागपूर येथे प्रथम शाखा स्थापन
हिंगणा ( दि. १७ एप्रिल २०२५) अखिल भारतवार्षीय मारवाडी संमेलन प्रणित मारवाडी संमेलन नागपूर शाखा व मारवाडी युवा मंच नागपूर शाखा यांच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या शपथ ग्रहण समारोह नागपूर एमआयडीसी येथील एम आय ए क्लब येथे उत्साहात पार पडला.
शपथ ग्रंहण समारंभाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार गिरीश व्यास तर मुख्य उपस्थिती म्हणून अखिल भारतवर्षीय मारवाडी संमेलनाचे राष्ट्रीय संघटन मंत्री वीरेंद्र धोका शपथविधी अधिकारी म्हणून महाराष्ट्र प्रदेश मारवाडी संमेलणाचे प्रांतीय अध्यक्ष निकेश गुप्ता, महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंचच्या अध्यक्ष अमृता भुतडा प्रमुख उपस्थिती म्हणून मारवाडी संमेलनाचे महामंत्री सुदेश करवा, प्रादेशिक मारवाडी युवा मांचाचे उपाध्यक्ष रोहित रुंगटा विशेष अतिथी म्हणून कैलास राठी, रामकिशोर वर्मा, सुनील (जैन) खाबिया, उमेश पंचांरिया, माहेश्वरी भवन नागपूरचे अध्यक्ष वीरेंद्र चांडक, सचिव योगेश राठी, खंडेलवाल समाजाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
शपथ ग्रहण समारंभाचे संयोजन अतुल कोटेचा, सुधीर बाहेती, संजय पालीवाल, अजय मल, निशांत गांधी, राजेश अग्रवाल, ऍड डी काकांनी, गिरीश नत्थानी, सोमप्रकाश मंत्री यांनी केले
नागपूर शहरात प्रथमच गठीत झालेल्या मारवाडी संमेलन शाखेच्या अध्यक्षपदी कन्हैया मंत्री, सचिव म्हणून हेमंत शर्मा, कोषाध्यक्ष दीपक अग्रवाल तर मारवाडी युवा मंच नागपूर शाखेच्या अध्यक्षपदी हिमांशू चांडक, सचिव अभिषेक जोशी व कोषाध्यक्ष म्हणून अरिहंत बैद यांनी शपथ घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश बंग,सूत्रसंचालन अरुणा बंग तर आभार अभिषेक जोशी यांनी मानले.
कार्यक्रमाला मारवाडी मिड टाऊनच्या अध्यक्ष अंजली मंत्री, रश्मी शर्मा, दीपा अग्रवाल, संस्कृती खंडेलवाल, अंजु अग्रवाल, निधी बैद, वर्षा शर्मा, मधू शर्मा, केविला शर्मा, प्रियांका तिवारी आदींसह मिड टाऊन च्या पधादिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
मारवाडी संमेलणाच्या नागपूर शाखेत शरद खंडेलवाल, निलेश अग्रवाल, मनीष छल्लानि, लक्ष्मीकांत मणियार, विजय जोशी, विजय सारडा, शरद राठी राजेश मोहता, विश्वजीत भगत, संजय लोया, किशोर पालीवाल, गिरीश पुरोहित, आदित्य भैया, हरीश राठी, रुपेश गुलेचा, सचिन अग्रवाल, संजय अग्रवाल, आकाश चांडक, राज चांडक, सुनील डागा, हरीश बंग, योगेश मालपाणी, मिरज गांधी, नीरज लखोटिया, अमर पालीवाल तर मारवाडी युवा मंच नागपूर शाखेच्या कार्यकारिणीत हेमंत राठी, आदित्य व्यास, मुकुल दरक, रवी गोयंका, विक्रम शर्मा, प्रतीक बागडी, दीपक जैन, डॉ यश अग्रवाल, गौरव कटारिया, रुचिर खंडेलवाल, ऋषी कोचर, राज अग्रवाल, महेश बजाज, सागर मंत्री, अनुज नथानी, प्रियांश लोया, सुमित चांडक, मधुर बंग, सौरभ गौतम, गौरव सोमानी, सावन अग्रवाल, मयूर पालीवाल, प्रवीण सारडा, हनी खंडेलवाल, ललित टावरी, आकाश सोनी व यश अग्रवाल यांचा समावेश करण्यात आला.




























































































































































































































































































































































































































