हिंगणा तालुक्यात कापूस,तूर, सोयाबीन, व हरभऱ्याचे आधारभूत खरेदी केंद्र सुरू करा - माजी मंत्री रमेशचंद्र बंग
राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
हिंगणा ( दि. १४ जाने. २०२५ ) हिंगणा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदी करण्याकरिता शासनाचे अधिकृत आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या नेतृत्वात हिंगणा तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.
निवेदनात हिंगणा तालुक्यात कापूस सोयाबीन तूर व हरभरा लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून तालुक्यात एकही आधारभूत खरेदी केंद्र नसल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादित केलेला शेतमाल खाजगी व्यापाऱ्यांना विकावं लागतो त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देऊ असे तत्कालीन उपमुख्यमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी हमीभाव जाहीर होण्याआधी शेतमाल विकला असेल त्यांना शेतमाल विक्री पावती दाखवून तफावत असलेली रक्कम अशी सुद्धा त्यांनी जाहीर केले होते परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर यांना शेतकऱ्यांचा विसर पडला असून आश्वासने देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याची काम या भाजप सरकारने केली. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेला हमीभाव शेतकऱ्यांना मिळत नाही तेव्हा हिंगणा तालुक्यात शासनाने तातडीने कापूस सोयाबीन तूर व हरभरा आदी शेतमालांचे आधारभूत खरेदी केंद्र सुरू करावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र आंदोलन भरण्यात येईल त्यामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेस शासन प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे म्हटले.
यावेळी तालुकाध्यक्ष योगेश सातपुते, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव आव्हाळे, डिगडोह मंडळ अध्यक्ष प्रदीप कोटगुले, खरेदी-विक्री संस्था अध्यक्ष श्यामबाबू गोमासे, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष हनुमान दूधबळे, मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष दिनेश ढेंगरे, माजी उपसभापती उमेश राजपूत, किसान सेल तालुकाध्यक्ष राजेंद्र गोतमारे, नगरसेवक प्रवीण घोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रेमलाल चौधरी, खरेदी-विक्री संस्थेचे संचालक रामकिशोर महल्ले, वानाडोंगरी शहराध्यक्ष हरिभाऊ रसाळ, जिल्हा संघटक सुशील दीक्षित, माजी सरपंच इनायतुल्ला शेटे, शिवा सहकारी सोसायटी अध्यक्ष सुरेश शेंडे, निलडोह शहर अध्यक्ष संदीप नेहारे, तालुका सचिव विठ्ठल हुलके, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप फलके, लक्ष्मी सहकारी दूध सोसायटीचे अध्यक्ष निखिल उमरेडकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.




























































































































































































































































































































































































































