काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची बैठक
★ स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी प्रारंभिक चर्चा
कामठी : दि. ५ नोव्हेंबर २०२५ ) होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात महत्वाची चर्चा घेण्यात आली.
या बैठकीत काँग्रेस प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष सुरेशजी भोयर आणि वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी यांनी एकत्र येत सहयोग, संरचनात्मक समन्वय आणि परस्पर हितकारक पर्यायांवर संवाद साधला.
या बैठकीत काँग्रेस प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष सुरेशजी भोयर आणि वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी यांनी एकत्र येत सहयोग, संरचनात्मक समन्वय आणि परस्पर हितकारक पर्यायांवर संवाद साधला.
बैठकीत कामठीतील आगामी नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी समन्वयात्मक रणनीती तयार करण्याबाबत प्राथमिक विचारविनिमय झाला. दोन्ही पक्षांनी सामाजिक न्याय, प्रतिनिधित्व आणि विकासाचा अजेंडा एकत्र राबविण्याची भूमिका मांडली. आगामी काही दिवसांत दोन्ही पक्षांतून विस्तारित चर्चा आणि वारंवार विचारविनिमय करण्यात येणार आहे, अशी माहिती बैठकीतून देण्यात आली.
ही बैठक प्रा. अनिकेत मून यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अजय सहारे, शहराध्यक्ष मंगेश वानखेडे व पंकज टक्कामोरे उपस्थित होते.




























































































































































































































































































































































































































