नागपुरात बसपा जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार यांच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांचा उत्साह
★ पक्ष बळकटीचा घेतला संकल्प
( विशेष प्रतिनिधी )
नागपूर ( दि. २ ऑगस्ट २०२६) बहुजन समाज पक्षाचे नागपूर जिल्हाध्यक्ष आणि सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे अष्टपैलू नेतृत्व योगेश लांजेवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. या खास प्रसंगी लांजेवार यांच्यावर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य चाहत्यांकडून शुभेच्छांचा महावर्षाव करण्यात आला.
वाढदिवसाचे औचित्य साधून योगेश लांजेवार यांनी नागपूर शहर व जिल्ह्यात बहुजन समाज पक्ष संघटितपणे अधिक मजबूत करण्याचा आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्याचा राजकीय निर्धार व्यक्त केला.
★ आगामी निवडणुकांत विजय मिळवून बहन मायावतीजींचे हात बळकट करणार!
आपल्या वाढदिवसानिमित्त विचार मांडताना जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार म्हणाले नागपूर शहर व जिल्ह्यात बहुजन समाज पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक घट्ट करणे हे माझे मुख्य कर्तव्य आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणून आदरणीय बहन मायावतीजींचे हात बळकट करणे, हाच संकल्प मी आज माझ्या वाढदिवशी करत आहे.
★ जनसेवक नेतृत्वावर शुभेच्छांचा वर्षाव
गरीब, वंचित आणि होतकरू नागरिकांच्या हाकेला नेहमी धावून जाणारे निस्वार्थी व कर्मठ नेते म्हणून योगेश लांजेवार यांची ख्याती आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर जिल्ह्यातील विविध भागांतून कार्यकर्ते, नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना दीर्घायुष्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
योगेश लांजेवार यांनी घेतलेल्या या राजकीय संकल्पामुळे जिल्ह्यातील बसपा कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह आणि चैतन्य निर्माण झाले आहे.

































































































































































































































































































































































































































































































