वंचित तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
★ महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला
नागपूर ( दि. ११ एप्रिल २०२६ ) महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती वंचित बहुजन आघाडी, नागपूर शहर यांच्या वतीने सीताबर्डी येथील पक्षाच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी नागपूर शहराध्यक्ष मंगेश वानखेडे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाला आघाडीचे महासचिव राहुल दाईकर , मनोज सुटे, ज्येष्ठ सल्लागार आनंद चौरे, हरीश नारनवरे, कमलेश शेंभरकर, उपाध्यक्ष किशोर भाऊ धोटे, किरण देवरे, सिद्धार्थ भांगे, हरिदास गवई, शशांक उगले, विनोद मोहड़, विजय गोंडुले, चांद मोहम्मद , शिशुपाल देशभ्रतार, संदेश धन्वीज, युवक आघाडी चे अध्यक्ष पूर्व नागपूरचे आदित्य कापसे, कल्पेश चौहान महिला अध्यक्ष वनमाला उके, मधुमालती धोटे उपस्थित होते.
उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करून सामाजिक समता, शिक्षण आणि स्त्री-पुरुष समानतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करीत त्यांनी आपल्या भाषणातून महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत, आजच्या काळात त्यांच्या विचारांची गरज अधिक असल्याचे नमूद केले. तसेच वंचित बहुजन आघाडी समाजातील वंचित, शोषित घटकांच्या हक्कांसाठी सतत लढा देत राहील, अशी ग्वाही देण्यात आली. या प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.



































































































































































































































































































































































































































