डिगडोह शहरातील समस्यांचा डोंगर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे; रमेशचंद्र बंग
★ डिगडोह येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न
हिंगणा (दि. २६ फेब्रु. २०२६ ) डिगडोह शहरातील समस्यांचा डोंगर हा स्थानिक लोकप्रतिनिधीच्या उदासीनतेमुळे निर्माण झाला आहे शहरात अनेक ठिकाणी रस्ते नाल्या यासारख्या प्राथमिक समस्या मोठ्या प्रमाणात आहेत तर शहराची लोकसंख्या कितीतरी पटीने वाढून सुद्धा शहरात पाणीपुरवठा योजना नाही पाण्यासाठी शहरातील नागरिकांना वणवण भटकावे लागते हा संपूर्ण प्रकार या शहरातील आणि या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या राजकीय उदासीनतेमुळे निर्माण झाला आहे असे माजी मंत्री रमेशचंद्र बंग डिगडोह शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित कार्यकर्ता मेळावा व भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
यावेळी नुकत्याच झालेल्या डिगडोह नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या पक्षाच्या नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला व नगरसेवक सुरेश काळबांडे यांच्या नेतृत्वातून शेकडो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
व्यासपीठावर माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव आव्हळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, पंचायत समितीचे माजी उपसभापती उमेश सिहं ठाकूर,, भैय्यालाल ठाकूर, प्रभाकर देशमुख, प्रमोद बंग, दिवाकर दळवी, बाळासाहेब वाघमारे, बी एन सिंग, गटनेत्या मनाली महेश ठाकुर, नगरसेवक खुमराज रहांगडाले, भारत मेश्राम, विद्या देवगडे, श्रीधर मसराम , सुरेश काळबांडे, डॉ अमोली झोडापे, देवेंद्र सिंह, माजी पंचायत समिती सदस्य आकाश रंगारी, वानाडोंगरी नगरपरिषदेचे गटनेते अनुप डाखळे, इंद्रायणी काळबांडे, प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी काशिनाथजी मापारी, विष्णुपंत बावनकर, किरपाडे पाटील, बबनराव ठाकरे, राजुभाऊ नारनवरे, अभय रॉय, शरद बोरकर, राजुभाऊ नाईक, राजुभाऊ रोडे, रविंद्र व्यवहारे, सुनिल बडे, विष्णू खराडे, डांगे साहेब, आवारे साहेब, गोरले साहेब, विलास कानोडे, सुनिल कानोडे, विकास वानखेडे, ताज हुसेन, सुनिल नायडू, प्रशांत काळे, सुरेश राजवाडे, नकुल गोरले, पांडुरंग विधाते, संजय कडू, विवेकानंद सिंह, गंगाधर ठाकरे, बबनराव काळमेघ, दिलीप विश्वकर्मा, गोपाळ काळबांडे, नामदेवराव लोंढे, शंकर यादव, मोरदवे साहेब, अरुण खांडवे, रामचंद्र शेंडे, सुधाकर खांडवे, विशाल खुशाल पवने, गणेश आरखाडे गुरुजी, विश्वनाथ नायर, ओंकार डांगे, रामधन आवारे, विनायक गोरले, मुन्ना बिसेन, सुरेश राजवाडे, बालमुकुंद अनमारे, विजय नायर, गजानन मोहिते, विजय गोलात, प्रमोदराव रामटेके, श्रीकांत भराटे, विजय नायर, सुनील सिंग, अक्षय पांडे, गजानन पांडे, दिलीप बोरकर, आसिफ, प्रकाश चिमोटे, विनोद सिंग, महेश बोपचे, दीपक दुधारे, दिनेश ढोले, सुरेंद्र भारद्वाज, कैलास जाधव, कुंदन भोयर, नत्थूजी कुंभरे, सुधीर भोयर, अशोक गार्डे, निखिलेश भोरे, सरिता मनोज वर्मा, प्रिती गवळी, गीता राऊत, प्रविणा खडके, कोकिळा खुरद, पुष्पा खोबरगडे, सुनंदा लोखंडे, कंचन ठाकरे, पुनम यादव, प्रिती यादव, सुधा उपाध्याय, निलेश उपाध्याय, राजेश्वरी जैस्वार, मंजुषा कुळकर्णी, अनिता काळभुत, जया शंकरवार, आशा बोंडे, रुपाली खारोडे, वेदा यादव, दुर्गा सोनवणे, वर्षा ढोबरे, वनमाला देवगडे, शोभा हडवे, पदमा लडिकर, अनिता मांडवकर आदींनीराष्ट्रवादी काँग्रेस श्री शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घेतला




























































































































































































































































































































































































































