नीता ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीतून केली राजकीय कारकिर्द सुरु
★ चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या
नागपूर ( दि. 6 फेब्रु. 2026 ) नागपूर शहराच्या नवनियुक्त महापौर नीता ठाकरे यांचा जन्म मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये 4 एप्रिल 1970 झाले. त्यांचे शिक्षण एम. ए., बी. एड. पंर्यत झाले. कॉलेज मध्ये शिक्षण घेत असतांना अनेक आंदोलने केली. त्यांनी भारतीय जनता पार्टीतून राजकीय कारकिर्द सुरु केली. 2002 मध्ये त्यांची नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या महामंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 2007 मध्ये त्यांनी दक्षिण नागपूर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.
नीता ठाकरे यांची 2017 मध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे सदस्य म्हणून निवड झाली. ही जबाबदारी त्यांनी 2020 पर्यंत सांभाळली. 2020 मध्ये त्यांची नागपूर महानगर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्या चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या. पहिल्यांदा 2002 मध्ये नागपूर महापालिकेत त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्या 2007 व 2012 मध्ये सुद्धा सलग तीनवेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या. 2026 मध्ये पुन्हा चौथ्यांदा नगरसेविका म्हणून प्रभाग 28 क मधून 8721 मताधिक्यांनी नागपूर महानगरपालिकेत निवडून आल्या आहेत. त्या आज नागपूर शहराच्या महापौर पदी विराजमान झाल्या.




























































































































































































































































































































































































































