महाआरोग्य शिबिर ठरत आहे नागरिकांसाठी वरदान
★ स्कॅनिंग कॅम्पमध्ये उत्स्फूर्त सहभाग; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट
नागपूर, ( दि. १० जुलै २०२६ ) मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराअंतर्गत दक्षिण-पश्चिम नागपूर व पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या स्कॅनिंग कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी यांच्या संयोजनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमातून नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच पुढील उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
आज दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील विजय चुटेले यांचे कार्यालय (आयसोलेशन हॉस्पिटलजवळ, इमामवाडा), रेल्वे इन्स्टिट्यूट (अजनी रेल्वे कॉलनी), दत्त मंदिर (आय.टी. पार्क रोड, संभाजी नगर) आणि सिंधू भवन, सिंधी कॉलनी (खामला) तसेच पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील दशरथ नगर समाजभवन (बोरगाव) आणि डिग दवाखाना (धरमपेठ) येथे स्कॅनिंग कॅम्प पार पडले. विविध आजारांच्या तपासणीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला.
महाआरोग्य शिबिराची पाहणी करण्यासाठी नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज शिबिरस्थळी भेट देऊन सुरू असलेल्या आरोग्य सेवांची माहिती घेतली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत या उपक्रमाचे कौतुक केले तसेच आरोग्य सेवा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत समाधान व्यक्त केले.
स्कॅनिंग कॅम्पमध्ये तपासणी झालेल्या आणि पुढील उपचार तसेच शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांना अधिक सखोल निदानासाठी गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर येथे पाठविण्यात येत आहे. महाआरोग्य शिबिराचे संयोजक माजी आमदार संदीप जोशी यांनीही डायग्नोस्टिक सेंटरला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूस केली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अध्यक्ष प्रा. दिलीप दिवे (सुभाष नगर), महेंद्र भुगावकर (नरेंद्र नगर), ईश्वर ढेंगळे (त्रिमूर्तीनगर), विनोद शिंदे (धंतोली), विनय दाणी (धरमपेठ), विनोद बघेल (सुरेंद्रगड), अमर खोडे (झिंगाबाई टाकळी), शशांक खेकरे (जानकी मंडळ), किरण दातीर (हनुमान मंडळ) आणि प्रकाश यादव (अयोध्या मंडळ) यांच्यासह कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.
या मोफत आरोग्य उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी तसेच सहसंयोजक रितेश गावंडे, विनोद कन्हेरे आणि रितेश पांडे यांनी केले आहे.

































































































































































































































































































































































































































































































