किरण मिडब्रेन अकादमीतर्फे २९ इंडिया वर्ल्ड रेकॉर्डधारक विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार
नागपूर, (दि. २१ जुलै २०२६ ) किरण मिडब्रेन अकादमीतर्फे ब्लाइंडफोल्ड (डोळ्यांवर पट्टी बांधून) विविध ओळख कौशल्यांमध्ये इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करणाऱ्या २९ विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या असामान्य कौशल्यांचा गौरव करत त्यांना प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.
अकादमीचे संस्थापक डॉ. किरण काकडे यांच्या मार्गदर्शनात ध्यान, योग, एकाग्रता आणि व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित विशेष प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त क्षमता जागृत करून त्यांच्यात स्मरणशक्ती, निरीक्षणशक्ती, आत्मविश्वास आणि मानसिक एकाग्रता विकसित करण्याचे कार्य अकादमीकडून सातत्याने केले जात आहे.
या सत्कार सोहळ्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच श्रीमंत मुधोजी महाराज भोसले, मुस्ताक पठाण आणि डॉ.सुलक्षणा भुयार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी लेख काकडे, श्राविका बागडे, अन्विका बागडे, अन्विका मेश्राम, गोजिरी निनावे, अर्जुन दाभाडे, आर्यन रोकडे, कर्तव्य काकडे, श्री डुकरे, ताशी पानतावणे, ओवी फाये, अभिराज पाझरे, देवांश कलंत्री, निवी निम्बार्ते, शिव पजाई, देवयानी दानव, हृदय सातपैसे, सानवी वर्मा, नक्श लाम्बे, युगांत वंजारी, विहान जिवने, विनमयी चकोले, भार्गव तुळकाने, खुश धुवाविया, भाव्या बोकडे, आरोह मते, अरहंत थूल, निर्भय एंचिलवार आणि तोशनव डोये या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाचे कौतुक करत किरण मिडब्रेन अकादमीच्या ध्यान, योग आणि एकाग्रतेवर आधारित प्रशिक्षण पद्धतीचे अभिनंदन केले.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत असून भविष्यातही अशा गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

































































































































































































































































































































































































































































































