हद्दपार आरोपीस अटक; वाडी पोलिसांची मोठी कारवाई
वाडी ( २ आक्टों २०२६ ) : नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला वाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. बबलू दिवाकर वानखेडे, वय २८ वर्षे, रा. रमाबाई चौक, आंबेडकर नगर, वाडी, नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७:४० वाजताच्या सुमारास वाडी पोलिसांचे तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग (गस्त) घालत होते. दरम्यान, पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, हद्दपार असलेला गुन्हेगार बबलू वानखेडे हा जवाहर कॉलेजजवळ फिरत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ नमूद ठिकाणी जाऊन सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पथकाने त्याला चारी बाजूंनी घेराव घालून ताब्यात घेतले.
संशयिताची चौकशी करून पोलीस ठाण्यात त्याचा गुन्हे अभिलेख (रेकॉर्ड) तपासला असता, त्याला पोलीस उप आयुक्त परिमंडळ क्र. १ यांच्या आदेश क्र. ३७२६/२०२४ दिनांक १२ नोव्होंबर २०२४ अन्वये नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून २ वर्षांकरिता हद्दपार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
हद्दपारीचा आदेश लागू असतानाही कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, पोलीस ठाणे हद्दीत कोणता तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरताना आढळल्याने आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने वाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम १४२ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
या प्रकरणाचा पुढील सखोल तपास वाडी पोलीस करीत आहेत.
( फोटो एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन बनविण्यात आली. )




























































































































































































































































































































































































































































































































































