राज्य कामगार विमा योजना रुग्णालय सोमवारी पेठ येथे सेवा संकल्प अभियान १७ पासून
नागपूर ( दि१४ सप्टेंबर २०२६ ) महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे आयुक्त कार्यालय, राज्य कामगार विमा योजना मुंबई यांच्या आदेशानुसार राज्य कामगार विमा रुग्णालय, सोमवारी पेठ ,नागपूर येथे दिनांक १७ सप्टेंबर पासून ते १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सेवा संकल्प अभियान राबविल्या जाणार आहे .या कार्यक्रमाच्या अंतर्गत रुग्णांना आणि विम्मेदार व त्याच्या कुटुंबीयांना या सेवा प्रकल्प अभियाना अंतर्गत आरोग्य तपासणी उपचार, जनजागृती, तसेच विविध आजारांविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे सामाजिक जनजागृती चे उपक्रम सुद्धा राबविल्या जाणार आहेत. यात प्रामुख्याने वृक्षारोपण, रक्तदान व अवयवदान जागरूकता शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, योग व ध्यान शिबिर ,स्वच्छता शिबिर, व्यसनमुक्ती भारत जनजागृती शिबिर ,महिलांचे आरोग्य व स्वच्छता ,पोषण व रक्तालपता जनजागृतीची शिबिर ,बालरोग शिबिर , अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून हा सेवा संकल्प अभियान राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सोमवारी पेठ ,नागपूर ,येथील बाह्य रुग्ण विभागात व रुग्णालयात पार पडणार आहे. या उपक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली व्यवहारे, डॉक्टर हर्षवर्धन कांबळे बाह्य रुग्ण विभाग प्रमुख हाताळणार आहेत. डॉक्टर प्रणव चांदेकर ,डॉक्टर फैजान खान ,डॉक्टर स्वप्नील वाठोळे ,डॉक्टर प्रशांत मेश्राम इत्यादी वैद्यकीय अधिकारी या संपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन पार पाडणार आहे.



























































































































































































































































































































































































































































































































































